वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचा आज शेवटचा टी20 सामना

टीम इंडिया  (Team India) आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 सीरिजमधील (T20 Series) शेवटचा सामना आज खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना बंगळुरूमधील (Bengaluru) के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ याच वर्षी जूनमध्ये टी-२० वर्ल्ड कप खेळणार आहे.

यापूर्वी खेळवली जाणारी टीम इंडियाची ही शेवटची टी20 सीरिज असणार आहे. टीम इंडियानं अफगाणिस्तानविरोधातले दोन सामने जिंकून आधीच मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियानं मालिका जिंकल्यातच जमा आहे. पण आजचा शेवटचा सामनाही टीम इंडियानं खिशात घातला तर मात्र अफगाणिस्तानला क्लिन स्विप देण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाकडे आहे.  

टीम इंडिया विरोधात अफगाणिस्तानची ऐतिहासिक सीरिज आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत एकच आंतरराष्ट्रीय सीरिज खेळवण्यात आली आहे. 2018 मध्ये टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात टेस्ट सीरिज खेळवण्यात आली होती. तेव्हा द्विपक्षीय सीरिजमध्ये केवळ एकच टेस्ट मॅच खेळवण्यात आली होती. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघानं 262 धावांनी अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला होता. 

याव्यतिरिक्त टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत वनडे फॉर्मेटमध्ये एकही द्विपक्षीय सीरिज खेळवण्यात आलेली नाही. तर सध्या खेळवण्यात येत असलेली टी20 सीरिजही दोन्ही देशांमधील पहिली सीरिज आहे. अशातच अफगाणिस्तानही टीम इंडियाच्या विरोधात आपल्या पहिल्या टी20 सीरिजला क्लीन स्विपनं पराभूत करण्याच्या प्रयत्नात असेल.