सोशलमिडीयावर बदनामी १२ जणांवर गुन्हा! ६ जण ताब्यात

सोशल मिडिया हा आजकाल सगळ्याचा जीव झालेला आहे. परंतु तो जितका आपल्यासाठी चांगला आहे तितकाच वाईट ही आहे. लग्न मोडले म्हणून त्याने त्रागातून मुलीची सोशल मीडियावर बदनामी केल्याच्या समजातून एकांचे अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही अपहरण व मारहाणीची घटना २ नोव्हेंबर ला घडली होती. तब्बल दोन महिन्यानी सायबर सेल तंत्रज्ञानद्वारे तपास करून गुन्हा नोंद करण्यात आला. यामध्ये वडगाव पोलिसांनी १२ सशंयिता पैकी ६ जणांना अटक केली. त्यांना १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


यातील सशंयित शामराव तुकाराम मुंदाळे (रा. पेठवडगाव), अनिकेत नामदेव धनवडे (रा. दानोळी ता. शिरोळ), ओंकार मारूती हेंद्रे (रा. वनवासाची ता.कराड जि.सातारा) यांच्यासह मुलीचा भाऊ, पती अशा सहा जणांना अटक केली आहे. यातील अन्य सशयित हे कडेगाव, पलूस (जि. सांगली) तालुक्यातील आहेत. याबाबत फिर्याद शुभम संतोष खटावकर (रा.पेठवडगाव) याने पोलिसात दिली. यामध्ये संबंधित मुलीसह तिचा पती, दीर, आई, मामा आदी १२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आह