आपल्या हटके आणि अतरंगी फॅशनमुळे अभिनेत्री उर्फी जावेद कायम चर्चेत असते. कधी फुलांचा, ब्लेडचा, च्विंगमचा, साखळ्यांचा तर कधी गोणपाटाचा वापर करत ती तिचे हटके ड्रेस बनवते. अतरंगी ड्रेस परिधान केलेली उर्फी अनेकदा स्पॉट होत असते. पण तिने खुलासा केला आहे की, ती घरात कपडे परिधान करत नाही.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत उर्फीला ती ऑफ कॅमेरा कशी असते याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी खळबळजनक उत्तर देत अभिनेत्री म्हणाली,”माझं तीन खोल्याचं घर असून घरात असताना मी कधीच कपडे परिधान करत नाही”.
मी घरात विवस्त्र फिरते : उर्फी जावेद
उर्फी जावेद पुढे म्हणाली,”मी आधी भाड्याने राहत होते. त्यावेळी माझ्यासोबत त्या घरात 8-10 मुलीदेखील राहायच्या. आता मी मोठं घर घेतलं असून या घरात कपडे परिधान करायला मला आवडत नाही. घरातच नव्हे तर घराबाहेरही विवस्त्र फिरते. कधी मी पायझमा डोक्यावरुन घालते आणि टीशर्ट खाली घालते”.
उर्फी जावेद लवकरच ब्रेस्ट सर्जरी करणार आहे. याआधी तिने ओठांची सर्जरी केली होती. उर्फीने काही दिवसांपूर्वी 3BHK असणारा एक फ्लॅट खरेदी केला आहे. नव्या घरातील पूजेदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हायरल फोटोंमध्ये उर्फी एका व्यक्तीसोबत पूजा करताना दिसून आली. त्यानंतर अभिनेत्री गुपचूप साखरपुडा उरकला असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. याआधी ती प्रतीक सहजपालसोबत सिद्धिविनायक मंदिरात स्पॉट झाली होती.
उर्फी जावेदबद्दल जाणून घ्या…
उर्फी जावेद छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असली तरी हटके फॅशनमुळे ती जास्त चर्चेत आली आहे. उर्फीने 2016 मध्ये ‘बडे भैय्या की दुल्हनिया’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनयप्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कार्यक्रमात ती सहभागी झाली. ‘बिग बॉस ओटीटी’देखील तिने गाजवला आहे. उर्फी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून नव्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. आता उर्फीच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.
