वर्ल्डकपचे स्वागत करायला गुगलवर धावत आहेत खास ‘डक’

आजपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त गुगलने विशेष डूडल तयार केले आहे. गुगलचे हे डूडल एनिमेटेड फॉर्ममध्ये आहे. या एनिमेटेड डूडलमध्ये बदक त्यांच्या पंखांमध्ये बॅट घेऊन जोमाने धावताना दिसताय. हे डूडल सोशल मीडियावर शेअर करण्याचासुद्धा ऑप्शन देण्यात आलाय.

वर्ल्ड कप २०२३ ची सुरुवात अगदी काहीच तासांत न्यूझिलंड आणि इंग्लंडच्यामधील सामन्यासह होईल. भारतात होत असलेल्या या वर्ल्ड कपमध्ये १० टीम्स सहभाग घेत आहेत. हा विश्वचषक ४८ दिवसांचा असणार आहे. विश्वचषकातील सामने भारतातील दहा वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळले जाणार आहेत.

प्रत्येक संघाचे किमान 9-9 सामने असतील

यावेळी सर्व संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. येथे, राउंड रॉबिन अंतर्गत, प्रत्येक संघ इतर सर्व 9 संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. सर्वाधिक गुण मिळवणारे चार संघ सेमीफायनरल राउंडमध्ये पोहोचतील. दोन सेमीफायनरल राउंडमधील सामन्यानंतर अंतिम सामना खेळला जाईल. अंतिम सामना 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच अंतिम सामनाही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.