इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज…

इचलकरंजी वस्त्रनगरीला पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. तसेच जागोजागी गळती लागल्याने देखील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 43 हजार नळ जोडण्यांना मीटर बसवण्यासाठी 58 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे.

परंतु अजूनही मंजुरी मिळालेली नाही. जर या प्रस्तावास मंजुरी झाली तर नळांना मीटर बसवण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे शहरांमध्ये जे पाणी वाया जाणारे आहे ते किमान 30 टक्के पाणी वाचणार असल्याने सदरचा हा प्रस्ताव त्वरित मंजूर करणे गरजेचे असल्याचे पर्यावरणवादी व्यक्त करत आहेत.

त्यामुळे हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर इचलकरंजी वासियांना पाण्यासाठी म्हणजे नळांना मीटर लावल्याने जेवढे पाणी नागरिकांना आवश्यक आहे तेवढाच वापर करून पाण्याचा काटकसरीने वापर होणार आहे आणि पाण्याची बचत देखील होणार आहे.