इचलकरंजीत पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर बनत असलेला पहायला मिळत आहे. पाण्यासाठी खूपच शहरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सुळकुड पाणी प्रश्न पुन्हा पेटणार असून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचा निर्धार सुळकुड पाणी कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीवेळी करण्यात आला. पाणी प्रश्नासाठी आमदार आवाडे आणि खासदार धैर्यशील माने यांना इचलकरंजी कराने बहुमताने निवडून दिले होते.
इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याची जागा दाखवून देऊ असा इशाराही कृती समितीच्या नेत्यांनी दिला आहे.सुळकुड पाणी योजनेच्या प्रश्नी शासन स्तरावरून कोणत्याही हालचाली होत नसल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी मध्ये सुळकुड पाणी योजना कृती समिती च्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर टीकेची झोड उठवत निषेध व्यक्त केला.इचलकरंजीला पाणी मिळण्यासाठी आता रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी शहरातील सर्व नागरिकांना एकत्र करून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार या सभेमध्ये करण्यात आला. कृती समितीच्या नेत्यांना बिनकामाचे टोळकं असं आमदार आवाडे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये संबोधित केले होते त्याचा सर्वच नेत्यांनी खरपूस भाषेत समाचार घेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जागा दाखवून देऊ असा इशाराही यावेळी दिला.