मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्याने पंढरीत मराठा समाज बांधवांचा जल्लोष मराठा आरक्षणाचे अध्यादेश निघाल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी एकमेकांवर गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.
मराठा समाज बांधवांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती महाराज शिवाजी चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते पंढरपूर अर्बन बँक ते नाथ चौक या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, मराठ्यांच्या एकजुटीचा विजय असो, मनोज जरांगे-पाटील आगे बढो, अशा जोरदार घोषणा देत जल्लोष केला.
या जल्लोष फेरीमध्ये शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, नागेश भोसले, दीपक वाडदेकर, अमर पाटील, संतोष कवडे, शनि घुले, शंकर सुरवसे, तानाजी मोरे, सुमित शिंदे, विनोद लटके, जगदीश पवार, बंटी भोसले, मुन्ना भोसले, आकाश पवार, मुन्ना मलपे, निलेश कोरके आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधवांनी केलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आज आरक्षणाचा अध्यादेश जारी केला. त्यामुळे मराठा समाज बांधवांच्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे. मराठा समाज बांधवांनी आज पंढरीत मोठा जल्लोष साजरा केला