5 फेब्रुवारीच्या अजितदादांच्या दौर्‍यात…..

सद्या अनेक पक्षात फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश देखील करत आहेत. अनेकजण हे आपापल्या पक्षातील नेतेमंडळींची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) 5 फेब्रुवारीला सांगलीच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्या दौर्‍याची जय्यत तयारी अजित गटाकडून सुरू झाली आहे.

कुपवाड व सांगलीत त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीतील अनेकांचे पक्ष प्रवेश होणार आहेत. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या दौर्‍यापूर्वी माजी नगरसेवकांची नाराजी दूर करून त्यांना राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) प्रवाहात आणण्यसाठी जयंत पाटील (Jaynat Patil) यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश येणार की नाही हे दि. 5 फेब्रुवारीच्या पवारांच्या दौर्‍यावेळी स्पष्ट होईल.