सोलापूर जिल्हा हा दुष्काळ भाग म्हणून ओळखला जातो. पाण्याची तीव्र टंचाई या भागात जाणवते. तर ही टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची तयारी सुरू आहे.
उजनी धरणातून सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून ते १५ फेब्रुवारीपासून सुरू असणार आहे. सध्या उजनीतील पाणीसाठा उणे सात टक्के असून फेब्रुवारीअखेर धरण उणे ३० टक्के होईल. त्यावेळी सोलापूर शहराला जलवाहिनीद्वारे पाणी घेण्यासाठी दुबार पंपिंग करावे लागणार असून त्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.