अनेक गावात राबवल्या गेलेल्या उपक्रमांमुळे त्या गावाची चर्चा सर्वत्र होत असते. आशाच एका उपक्रमांमुळे येलूर या गावाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. येलूर (ता. वाळवा) येथे जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजन महाडिक, सम्राट महाडिक यांनी जुन्या रूढींना बाजूला सारून विधायक निर्णय घेतला. राजन यांच्या मातोश्री रुक्मिणी यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी जेवणावळीचा खर्च टाळून ती रक्कम प्राथमिक शाळेला दिली.
राहुल महाडिक म्हणाले, जुने अनिष्ट रितीरिवाज आता बदलले पाहिजेत. प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पुरेशा सुविधा मुलांना मिळाल्या पाहिजेत दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी समाजातील जबाबदार घटकांनी पुढे आले पाहिजे. अनावश्यक चालीरीती बंद करून शाळांना मदतीसाठी हात पुढे केला पाहिजे. कोरोनानंतर येलूर ग्रामस्थांनी चौदाव्याचे विधी बंद केले, तिसऱ्या दिवशीच विधी करण्याची प्रथा सुरू केली.
अशा विधायक उपक्रमाचा भाग म्हणून आम्हीही शाळेला मदत केली. शाळेचे केंद्रप्रमुख दिनकर नांगरे, भगवान जाधव, विजय पाटील, राजेंद्र गायकवाड, शामकांत शिंदे यांनी मदतीचा धनादेश स्वीकारला.