म्हैसाळच्या पाण्याचे योग्य वाटप करा : आमदार आवताडे

सध्या अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आपल्याला पाहायला मिळतेच. तशातच सोलापूर, मंगळवेढा या भागात पाण्यासाठी खूपच नागरिकांना वणवण करावी लागते. पिढ्यान पिढ्यांच्या संघर्षातून म्हैसाळचे पाणी मंगळवेढ्यातील 19 गावांमध्ये आले आहे. पण या आलेल्या पाण्याचे टेल टू हेड या पध्द्तीने योग्य वाटप करा व माझ्या मतदारसंघातील लाभपट्यातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचवा, अश्या सूचना आमदार आवताडे यांनी म्हैसाळच्या अधिकाऱ्यांना केल्या.

दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील 19 गावांमधील 6 हजार हेक्तर क्षेत्रावर या पाण्याचा लाभ मिळणार आहे. पण पाण्याच्या वाटपात दुजाभाव होत आहे. अधिकारी पाणी वाटपात पक्षपणा करत असल्याचे नागरिकांचे मत होते. त्यामुळे आमदार आवताडे यांनी अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना केल्या व यापुढे शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी आल्यास त्याला अधीकारीवर्गांना जबाबदार धरले जाईल.

त्यानंतर आमदार आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, म्हैसाळ योजनेतून सलगर बुद्रुक सह कांही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी ही वेगळ्या पध्द्तीने नियोजन करू व त्यासाठी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या काढून पाहिजेत तेवढा निधी आणण्यात येईल.पाणी प्रशनाच्या या बैठकीसाठी 19 गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळेस शेतकऱ्यांकढुन आमदार आवताडेंना पाणी प्रशनाच्या संदर्भातील निवेदने देण्यात आली.