विद्यार्थिनींना सक्षम बनविण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. जेणेकरून त्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. माहुली (ता. खानापूर) येथील महात्मा गांधी विद्यालय व दत्ताजीराव देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थिनींना २५ सायकलींचे वाटप करण्यात आले. १० विद्यार्थिनींना प्रती महिना ७५० रुपयांप्रमाणे शिष्यवृत्तीही देण्यात आली. पुणे येथील परिवर्तन सामाजिक संस्थेने हा उपक्रम राबविला. निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी यासाठी प्रयत्न केले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य जे. के. जाधव उपस्थित होते. संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी माहुली विद्यालयासाठी १० संगणक भेट दिले. माहुली विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र
माहुली (ता. खानापूर) येथील महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थिनींना सायकली व शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.