१८फेब्रुवारी रोजी होणार शिष्यवृत्ती परीक्षा



सध्या सगळीकडे दहावी बारावीच्या परीक्षांचे वेड विध्यार्थी तसेच पालकांना लागलेले आहे. पालक विद्यार्थी जश्या परीक्षा जवळ येत आहेत तसे टेन्शन मध्ये असलेले आपणाला पहायला मिळत आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षा रविवारी (दि. १८) होणार आहे.

सांगली जिल्ह्यात २१२ केंद्रांवर व्यवस्था केली आहे. परीक्षेसाठी ३१ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाने ही माहिती दिली. राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १९ हजार १३४ आणि पूर्व माध्यमिकसाठी १२ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.