सोलापुरात १० ते १२ फेब्रुवारीला ‘शिवगर्जना’चा प्रयोग


राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे आयोजन ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते. अनेक जिल्ह्यात उत्साहात महानाट्य पार देखील पार पडले.

मात्र काही अपरिहार्य कारणामुळे हा कार्यक्रम आता १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालाच्या प्रांगणात दिनांक १० ते १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी हे महानाट्य पाहण्यासाठी उत्स्फूर्तपणे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.