इस्लामपूर येथे आम जयंत पाटील यांच्याकडून शादीखान्याच्या बांधकामाची पाहणी

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येक पक्ष आपापली मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. अनेक नेते दौरे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर ( शिवनगर) येथील मुस्लिम समाज ईदगाह व शादीखान्याच्या बांधकामास भेट देऊन कामाची पाहणी केली. आ. जयंतराव पाटील यांची दूरदृष्टी व त्यांनी दिलेल्या भरीव निधीतून हे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. आ. पाटील यांनी कामाच्या दर्जाचे कौतुक करून काही सूचना केल्या. याप्रसंगी माजी नगरसेवक पिरअली पुणेकर, ईदगाह कब्रस्तान समितीचे अध्यक्ष हाजी मुबारक जमादार उपस्थित होते.