इस्लामपूर येथे प्रतीक पाटील यांचा संवाद….

युवक कार्यकर्ते हे पक्षाचे बलस्थान आहे. भविष्यात युवकांना अधिक प्रोत्साहन द्यावे लागेल. बुथ अध्यक्षांसह सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सामान्य माणसांची कामे करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये १ तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. रविवारी उपजिल्हा रुग्णालयात होणाऱ्या महाआरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

ते म्हणाले, आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिरे झाली. त्यामध्ये १५ हजार रुग्णांनी लाभ घेतला. माजी नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, कृष्णेचे संचालक संजय पाटील, राजारामबापूचे संचालक शैलेश पाटील, राजकुमार कांबळे यांनी सूचना केल्या.


शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. शामराव पाटील, बी. ए. पाटील, विश्वनाथ डांगे, अरुणादेवी पाटील, कमल पाटील, अरुण कांबळे, बाळासाहेब पाटील, मुकुंद कांबळे, सुरेंद्र पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, सचिन कोळी, स्वरूप मोरे, शकील जमादार, जुबेर खाटिक, अबीद मोमीन, डॉ. सुनील पाटील, संजय जाधव उपस्थित होते. शंकरराव चव्हाण यांनी आभार मानले.