इचलकरंजी येथे महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. यामध्ये महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळतो. रोटरी क्लब तर्फे सतत काही न काही कार्यक्रमांचे आयोजन हे केले जातेच. इचलकरंजी येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाइल सिटीच्या वतीने साडी वॉकथॉन हा नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रविवारी (दि. (२५) रोजी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊन हा दिवस आपण सर्वजण मिळून
साडीचा उत्सव म्हणून साजरा करूया आणि माझी साडी, माझा अभिमान. हे पुन्हा एकदा सिद्ध करूया, असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र जैन व सचिव हेमंत दोशी यांनी केले आहे.