लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुकीचंही बिगूल वाजणार ? 

सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरु आहे. लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून भाजपाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. इतर पक्षही निवडणुकीसाठी कंबर कसून तयारी करत असून लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेसोबतच राज्यात विधानसभा निवडणूक घ्यायची का याची चाचपणी सुरू आहे. एकत्र निवडणूक घेतल्यास काय चित्र असेल या संदर्भात भाजपकडून सर्व्हे करण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही खासगी कंपन्यांकडून याबद्दल सर्वेक्षण सुरू असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर आणि पुरेशी माहिती हातात आल्यानंतर निवडणुकांबाबत पुढचा निर्णय होऊ शकतो.