सांगोल्यातील शेतकऱ्याचा नादच खुळा…….

सांगोला हा दुष्काळ भाग म्हणून ओळखीस आहेच पण आता सांगोल्यात अशी घटना घडली आहे ज्याची सर्व जिल्ह्यात चर्चा होऊ लागली आहे. आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नासाठी वडील कित्येक वर्ष तयारी करत असतात. मुलीचं लग्न म्हणजे कोणत्याही वडिलांसाठी भावनिक क्षण असतो. आपल्या मुलीचं लग्न होतय याचा वडिलांना आनंद असतो.

आपल्या मुलीचा विविहासोहळा वर्षनुवर्ष लोकांनी लक्षात ठेवावा यासाठी सांगोल्यातील एका शेतकऱ्यानं मुलीची वरात हटके पद्धतीनं काढली आहे. ना घोटा, ना बुलेट, थेट बैलगाडीतून नवरा नवरीनं लग्न मंडपात एण्ट्री घेतली. सांगोला तालुक्यातील विठ्ठल कोळेकर यांच्या मुलीचा विवाहसोहळा मोठा थाटात पार पडला. हे लग्न तालुक्यात चर्चेचा विषय बनलेला आहे.

विठ्ठल कोळेकर यांनी आपल्या मुलीची वरात पारंपरिक पद्धतीनं घोडा गाडीतून न काढता, शेतकरी राजाला प्रिय असलेल्या बैलगाडीतून काढली. तब्बल शंभर बैलगाड्यांसह मुलीकडचं वऱ्हाड लग्नमंडपात हजर झाल. ना घोटा, ना बुलेट, थेट बैलगाडीतून नवरा नवरीनं लग्न मंडपात एण्ट्री घेतली. या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.