योगाचार्य संगु गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्वास्थ्य योग शिबिर, बालसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जूनपासून महेश मानव सेवा संस्था येथे हे शिबिर होणार आहे.
महेश मानव सेवा संस्था , संगु गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट , भारत विकास परिषद नाशिक, मिडटाऊन पुरस्कृत एस . एस. वय. एस. मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योगाचे गेली ३० वर्षे मार्गदर्शन करणारे संगु गुरुजी यांचे इचलकरंजीतील पाचवे,संपूर्ण स्वास्थ्य योग शिबिर ५ जूनपासून सुरु होणार आहे.
हे शिबिर रोज सकाळी व सायंकाळी ६ ते ८:३० या वेळेत होत असून त्यामध्ये योग, प्राणायाम,ध्यान,आहार आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ७ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सकाळी १० ते १२ या वेळेत बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. त्यामध्ये मुलांविषयी असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यात येणार आहे. तसेच १५ ते २५ किशोर वयोगटातील मुलं-मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये मुलांच्या आत्मविश्वास, स्मरणशक्ती , एकाग्रता , संयम आदींची वाढ या शिबिरात करण्यात येणार आहे.