सांगोला – मिरज रोडवरील अनकढाल टोल नाक्यानजीक पोलिस पथकाने गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये एका वाहनातून जर्शी गायीची ३७ लहान खोंडे तर दुसऱ्या एका वाहनातून जर्शी गायीची ३९ लहान खोंडे व १ जर्शी गाय ताब्यात घेतली आहेत.
याप्रकरणी पो. हे. कॉ. अनिल शिवाजी बनसोडे यांनी विशाल मंछिंद्र मोरे, सिद्धार्थ सयाजी भोसले , प्रशांत शिवाजी जाधव (तिघे रा. कवठे महांकाळ जी. सांगली )यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
बेकायदेशीर जनावरांची वाहतूक ; तिघांवर गुन्हा दाखल
