आष्टा वाळवा पंचक्रोशीत चोरीच्या प्रमाणात वाढ…. सतर्कतेचे आवाहन

पलूस शहर आष्टा वाळवा व पंचक्रोशीत चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. फक्त रात्रीच नाही तर दिवसा सुद्धा चोर पाणी द्या जेवायला द्या अशा पद्धतीने विनवणी करून घरात शिरण्याचा प्रयत्न करून चोरी तसेच मारहाण करून निघून जातात. त्यामुळे सतर्क राहून दक्षता घ्या. अनोळखी लोकांना घरात घेऊ नका तसेच शक्य असेल तर मुख्य दरवाजाला लोखंडी दरवाजे बसून
घ्या अथवा लोखंडी शटर बसवून घ्या.

यावर सतर्क राहणे हाच यावर एकमेव उपाय आहे. सगळ्यांनी काळजी घ्या, चोरांचा खूप धुमाकूळ चालू आहे. सगळ्यांनी आपले मोबाईल चालू ठेवा. एकमेकांना सहकार्य करा, काही अडचण वाटल्यास एकमेकांना फोन करा. रात्री दरवाजे वाजवल्यास कोणीही दरवाजे उघडू नका. प्रत्येकाने काळजी घ्या, एकमेकांना सहकार्य करा. नविन व्यक्ती दिसल्यास चौकशी करा… आपल्या गावात व परीसरात लक्ष ठेवा. गावात काही भागात ड्रोन फिरत होते आसपासच्या भागात ज्या ज्या ठिकाणी ड्रोन फिरत होते तिथे नंतरच्या दोन दिवसांत काही ना काही घटना घडल्या आहेत. आज पासून पुढचे काही दिवस गावातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. असे आवाहन करण्यात आले आहे.