सांगोला तसेच मंगळवेढा या तालुक्यात दुष्काळाची स्थिती खूपच जाणवते. पाण्याची तीव्र टंचाई या भागात जाणवते. अनेक वर्षापासून दुष्काळग्रस्त समजला जाणारा मंगळवेढा तालुका हा आजही पाण्यासाठी वंचित आहे. निवडणूक असो वा नसो मी मंगळवेढा तालुक्याच्या या २४ गावातील पाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठविणार आहे, असे आश्वासन आम. प्रणिती शिंदे यांनी दिले आहे. मंगळवेढा तालुक्यातील २४ गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणीप्रश्नी बैठक मंगळवेढा तालुका काँग्रेस कार्यालयात आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
Related Posts
सांगोला एसटी स्टँड परिसरात निर्भया पथकाची धडक कारवाई…..
सांगोला बसस्थानकावर रोड रोमियोंची धरपकड करून नऊ ते दहा जणांवर सपोनी रुपाली उबाळे यांनी कारवाई केल्याने विद्यार्थिनी व महिलांकडून समाधान…
सांगोला मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी…..
सध्या आगामी विधानसभा निवडणुका काही महिन्यांवरच येऊन ठेपलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता लवकरच सुरू होणार असल्यामुळे ज्या त्या पक्षांची…
सांगोला विधानसभा मतदार संघात आबा- बापू आणि देशमुख बंधू……
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोर धरू लागलेले आहे. प्रत्येक पक्षातून जोरदार तयारी सुरू देखील झालेली आहे. कोणत्या पक्षामधून कोणाला उमेदवारी…