मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता!

देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशावेळी अजित पवारबारामतीकरांना भावनिक साद घालू लागले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळेंविरोधात कार्यकर्त्यांना ते सावध करत आहेत.

भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही, भावनिक होऊन कामे होत नाहीत, असे अजित पवार यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. मी मुख्यमंत्री पदासाठी हपापलेला नाहीय.

मी पक्षही चोरलेला नाहीय असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीबारामतीतील कार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे सुतोवाचही केले आहे.