इचलकरंजी येथे वखार भाग परिसरात जुनी अरविंद प्रोसेस आरमान मोमीन यांनी भाडे तत्वावर घेतली आहे. येथील वखार भाग परिसरातील अरविंद प्रोसेसमध्ये स्क्रॅप टेम्पोचे वेल्डिंग काम करताना अचानकपणे आगीचा भडका उडाला. याठिकाणी दुपारच्या सुमारास स्क्रॅप टेम्पोचे वेल्डिंग आणि कटींगचे काम सुरु होते. घटनेची माहिती समजताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
वेल्डिंग काम करताना उडालेल्या ठिणगीमुळे आगीचा भडका उडाला. याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.