माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतले. त्यानंतर आता काँग्रेसमधील अनेक नेते हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता प्रणिती शिंदे या देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे चर्चा सुरू आहे.
यावर आता काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. पक्षातून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना परत आणण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे. उलट आम्ही भाजपला नष्ट करू असा इशारा प्रणिती शिंदे यांनी दिला.