आटपाडी ,कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाने २ जुलै २०२५ पर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे.
न्यायालयाने यासंदर्भात कृषी पणन मंडळ, पुणे आणि जिल्हा उपनिबंधक यांना सुनावणीवेळी योग्य स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हा आदेश याचिकाकर्ता व विरोधी गटाच्या संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने देण्यात आला आहे.
आटपाडी बाजार समितीने सहाय्यक निबंधकाच्या परवानगीने खासगी कंपनीचे माध्यमातून नोकर भरतीची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र या भरतीला बाजार समितीचे विरोधी गटाचे संचालक दादासाहेब हुबाले यांनी जोरदार विरोध केला. त्यानुसार खासगी संस्थेमार्फत भरतीस बहुमताने नकार असल्याचा मुद्दा त्यांनी न्यायालयात मंडला. या पार्शभूमीवर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी घेत न्यायालयाने २ जुलैपर्यंत बाजार समितीने भरती प्रक्रिया पुढे राबवू नये, असा स्पष्ट आदेश दिला आहे.
