तुम्हीही ‘कॉटन कॅंडी’ खाण्याचे शौकीन असाल तर …

तुम्ही बऱ्याचदा ‘बुढ्ढी के बाल’ म्हणजेच’कॉटन कँडी’ कापसाचा गोळा जत्रेत किंवा बाजारात विकताना पाहिले असतील. विशेषत: मुलांना या गोड कॅंडीची विशेष आवड असते. जर तुमची मुलंही ‘बुढ्ढी के बाल’ खाण्याचे शौकीन असतील तर तुम्ही काळजी घ्यावी लागणार आहे. कारण या मुलांच्या आवडत्या कॅंडीमध्ये कर्करोग निर्माण करणारी रसायने आढळून आली आहेत. या गोड पदार्थाला इंग्रजीत ‘कॉटन कँडी’ म्हणतात. एका रिपोर्टनुसार, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत या मिठाईमध्ये रोडामाइन-बी रसायन आढळले आहे. हे रसायन कापड उद्योगात वापरले जाते. या रसायनामुळे शरीरात कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यामुळेच या संदर्भातील माहिती समोर आल्यानंतर दोन राज्यांनी यावर बंदी घातली आहे.