पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २७ किंवा २८ फेब्रुवारीला शासन आपल्या दारी उपक्रम होणार आहे. हा कार्यक्रम वाखरी येथे घ्यावा की ६५ एकर जागेत घ्यावा, या संदर्भातील अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व पंढरपूरच्या तहसीलदारांना केली आहे.या कार्यक्रमासाठी ४५ ते ५० हजार लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्या दृष्टीने वाखरी किंवा ६५ एकर जागेत वाहनांची पार्किंग व्यवस्था या अनुषंगाने माहिती प्रशासनाला त्वरित सादर करण्याचीही सूचना केली आहे.या उपक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचना केल्या.
Related Posts
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान! २७२८ शेतकऱ्यांना मिळणार विहिरी
राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाख रुपयांची अनुदान दिले जाते रोहयो तून सहा महिन्यात विहिरीचे काम पूर्ण होणे अपेक्षित…
विधानसभा निवडणुकीत द्यावा लागणार तगडा उमेदवार
सोलापूर लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय नेते विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघात नाना पटोले यांचे कट्टर समर्थक व माजी…
दफन केलेल्या दहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह स्मशानभूमीतून गायब!
सोलापूर येथील मोदी स्मशानभूमीत दोन दिवसांपूर्वी दफन केलेल्या दहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याची घटना तिसर्या दिवशीच्या विधीदिवशी घडली. त्यामुळे…