इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.फेब्रुवारी-मार्च २०२४ सत्रातील लेखी परीक्षेला आज बुधवार (ता. २१) पासून सुरवात होत असून, इंग्रजी विषयाचा पहिला पेपर पार पडणार आहे. बारावीच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहे.
ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून, अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत मंगळवारी (ता. २०) परीक्षा केंद्राला भेट देत आसनव्यवस्थेची माहिती जाणून घेतली.अपरिहार्य कारणामुळे प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार २० ते २२ मार्चदरम्यान संधी मिळणार आहे.