‘या’ जिल्ह्यात बरसणार अवकाळी पावसाचे संकट

राज्यात एकीकडे उष्णतामन वाढत असताना आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. सध्या एक पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला असून या सोबतच उत्तर भारतात वाऱ्याच्या वरच्या थरामध्ये एक जेट्स स्ट्रीम जास्त तीव्र असल्याने याचा परिमाण राज्याच्या हवामानावर होणार आहे.राज्यात पुढील काही दिवस ढगाळ हवामानासोबत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

२५ व २६ फेब्रुवारीच्या जवळपास बंगालच्या उपसागरातून आग्नेय वारे राज्यात आर्द्रता घेऊन येणार असून, त्यामुळे विदर्भामध्ये २६ व २७ फेब्रुवारीला तर मराठवाड्यात २७ फेब्रुवारीला ढगाळ वातावरणाबरोबर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार-पाच दिवस राज्याच्या संपूर्ण भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आज दुपार नंतर २३ तारखेपर्यंत किमान तापमानाच बरोबर कमाल तापमानात मात्र किंचित घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या हवामान बदलात कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील २६ तारखेनंतर काही भागात पाऊस पडण्याची वर्तवण्यात आली आहे.पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील तीन-चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे.