बारावीनंतर काय? एकापेक्षा एक भारी कोर्स……

बारावी परीक्षा सध्या सुरु झालेली आहे. परीक्षेवेळी विध्यार्थ्यांना खूपच टेन्शन येते. परीक्षा झाल्यानंतर देखील पालक विध्यार्थी हे पुढे नेमके कोणते क्षेत्र निवडावे यामुळे देखील खूपच हतबल होतात. बारावी सायन्सनंतर काय करीअर निवडावे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. मग त्यावेळी इंजिनियरिंग, मेडिकल किंवा बी. एस.सी शिवाय कोणतेच पर्याय दिसत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला या व्यतिरीक्त असे पर्याय सांगणार आहोत जे ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल. सायन्स किंवा विज्ञान स्ट्रीम मध्ये एक दोन नव्हे तर बरेच पर्याय आहे. त्यापैकी काही पर्याय आ़़ज आपण जाणून घेणार आहोत.

नॅनोटेक्नोलॉजी

बारावीनंतर नॅनोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय आहे. नॅनोटेक्नोलॉजीमध्ये बीएससी किंवा बीटेक झाल्यानंतर त्याच विषयातील एमएससी किंवा एमटेक करून या क्षेत्रात उत्तम करियर बनवू शकता.

रोबोटिक सायन्स

रोबोटिक सायन्स खुप मोठे क्षेत्र आहे. या या क्षेत्रात अनेक स्पेशलायझेशन कोर्स छान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स सिस्टम, कॉम्प्युटर सायन्स मधून पदवी घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रम करु शकतात. यानंतर विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या नामांकित संस्थेत संशोधन कार्यात नोकरी मिळू शकते.

एन्व्हायर्नमेंटल सायन्स –

पर्यावरणप्रेमी या क्षेत्रात उत्तम करीअर घडवू शकतात. या अंतर्गत इकॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, वाईल्डलाईफ मॅनेजमेंट, पोल्युशन कंट्रोल,सारखे विषय शिकवले जातात. यात करीअर म्हणून नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.

स्पेस सायन्स

हे विज्ञानाचे खूप विस्तृत क्षेत्र आहे. या अंतर्गत कॉस्मॉलॉजी, स्टेलर सायन्स ,प्लॅनेटरी सायन्स ,ऍस्ट्रॉनॉमी अशी अनेक क्षेत्रे आहेत. याचा अभ्यासक्रम केल्यास बंगलोरमध्ये असलेल्या इस्रो आणि आयआयएससी (IISC)मध्ये नोकरीची उत्तम संधी असते.

डेयरीसायन्स

दुग्ध क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे आहे. दुग्ध उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेयरी टेक्नॉलॉजी किंवा डेयरी सायन्स अंतर्गत आपण यात शिक्षण घेऊ शकतो. विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्टुडन्ट ऑल इंडिया आधारावर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांच्या पदवीधर डेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्र करु शकतो.