तज्ञांचा सल्ला मोफत! डॉ. केतकी साखरपे यांचे गर्भवती महिलांसाठी मार्गदर्शन……

निरोगी, सदृढ आणि व्यंगरहीत बाळ जन्माला येण्यासाठी कोणत्या महिन्यांमध्ये कोणती तपासणी करणे गरजेचे आहे यावर डॉ. केतकी साखरपे यांचा सल्ला आपण पाहत आहोत. गेल्या आठवड्यात आपण पहिली आणि दुसरी तिमाही मध्ये कोणत्या तपासणी करायच्या हे पहिले. आज आपण तिसऱ्या तिमाहीत कोणत्या तपासण्या करायच्या आहेत हे जाणून घेऊ.

तिसरी तिमाही म्हणजे सातवा, आठवा व नववा महिना. सातवा व आठवा या दोन महिन्यांमध्ये गरोदर स्त्रीने दर पंधरा दिवसांनी तपासणीसाठी हॉस्पिटलला भेट द्यावी. सातव्या महिन्यामध्ये ही ( BC, Urine CR) रक्त तपासणी करतात. बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही हे पाहण्यासाठी Growth scan करणे आवश्यक आहे.

नववा महिना लागल्यानंतर दर आठ दिवसांनी तपासणीसाठी हॉस्पिटलला जावे. नववा महिना लागल्यानंतर परत (BC, Urine CR) या रक्त तपासण्या परत कराव्या लागतात. तसेच बाळाचे वजन व बाळाभोवतालचे पाण्याचे प्रमाण व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी नवव्या महिन्यात Growth scan करणे जरुरीचे असते.

याव्यतिरिक्त ज्या गरोदर स्त्रियांना गरोदरपणातील उच्च रक्तदाब, थायरॉईड, ज्या स्त्रियांचे पहिले बाळ पोटामध्ये मृत झालेले आहे अशा काही केसेसमध्ये रक्ताच्या काही जास्तीच्या तपासण्या करणे आवश्यक असते. डिलिव्हरीची तारीख उलटून गेलेली आहे, उच्च रक्तदाब आहे, बाळाची हालचाल कमी प्रमाणात होत आहे, त्यांची Colour doppler ही अतिरिक्त सोनोग्राफी करणे गरजेचे असते.

यामध्ये बाळाचा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे की नाही हे तपासले जाते. डिलिव्हरी झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी CBC वर TSH करावे.

डॉ. केतकी साखरपे
(MBBS, DGO,DNB)
साखरपे हॉस्पिटल,
फुले रोड इचलकरंजी
मोबाईल नंबर 7276122635