फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आंदोलन…..

मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची गंभीर टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा कार्यकर्ते जरांगे पाटलांच समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची जरांगेंची भूमिका असून ते उपोषण स्थळ सोडून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उपोषण करुन मरण्यापेक्षा फडणवीसांच्या दारात जातो, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळावरून निघून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहोचले आहेत. सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, मुंबईच्या दिशेने निघाले असताना अशक्तपणामुळे जरांगे पाटील यांना भोवळ आली, त्यामुळे येथे प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे.