‘या’ शेतकऱ्यांना PM किसानचा 16 वा हप्ता मिळणार नाही कारण…..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता कधी जमा होणार याची सर्वांनाचं प्रतीक्षा होती. मात्र, ही प्रतीक्षा आता संपली आहे.येत्या 28 फेब्रुवारीला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना 16 वा हप्ता मिळणार नाही.

कारण, ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची कागदपत्रे अपलोड करणे, सक्रिय बँक खात्याशी आधार लिंक आणि ई-केवायसी ( Ekyc) केली नाही, त्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता मिळणार नाही.

PM किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16 व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

PM किसान सन्मान निधीचा चा 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित करणार आहेत. ज्यामध्ये हा हप्ता डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल.