पेठवडगावचे आदर्श गुरुकुल विद्यालयने जिल्ह्यात मारली बाजी!

पेठ वडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज जिल्ह्यात आदर्शवत ठरली आहे. महाराष्ट्र शासनाकडून आयोजित केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच पुढील विभागीय स्तरावर या विद्यालयाची निवड झाली आहे.

या शाळेने यापूर्वी केंद्र स्तरावर व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्र शासन शिवछत्रपती वनश्री पुरस्कार, १ लाख ४ हजार ४४४ सूर्यनमस्कार या अनोख्या उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

शिव विचार दौड व ५५५ विद्यार्थ्यांच्या सहभागाने शिवचरित्र पारायण सोहळा साजरा केला. या उपक्रमाची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. मुख्याध्यापक संघाकडून स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण समितीकडून इको फ्रेंडली व ग्रीन स्कूल अवॉर्डने सन्मानित केले आहे.