मा. आ. जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत बालभवनने प्रख्यात चित्रकार अन्वर हुसेन यांची निरीक्षणात्मक चित्रकला कार्यशाळा आयोजित केली होती. शालेय मुलांसाठी अत्यन्त प्रिय असणार्या या उपक्रमात इस्लामपूर येथील कुसुमगंध उद्यानात १०३९ मुले उपस्थित होती.
या कार्यशाळेत सहभागी असणार्या मुलांनी सुप्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली रेखाटलेल्या उत्कृष्ठ चित्रांना पारितोषिक जाहीर करण्यात आली.
स्वराली लवटे विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम, इस्लामपूर, ईश्वरी मुळे विद्यानिकेतन इंग्लिश मेडियम, इस्लामपूर, संस्कृती धोंगे इस्लामपूर हायस्कूल, इस्लामपूर, मधुरा सुतार – विद्यामंदिर हायस्कूल, इस्लामपूर, आर्यन मंडले इस्लामपूर हायस्कूल, इस्लामपूर, मेघना आमने – जि. प. शाळा नं. २, नेर्ले, झोया मुल्ला जि.प. उर्दू शाळा नं. ३, इ.पूर, श्रुती घेवदे गुरुदेव हायस्कूल, प्रज्वल बिचकर विद्यामंदिर हायस्कूल, मोहोम्मद कैस नदाफ यशवंत बालक मंदिर, इस्लामपूर, समीक्षा गुजर लाल बहादूर शास्त्री विद्यालय, बहे, यश अरुण जाधव आदर्श बालक मंदिर, यशश्री मोकाशी सद्गुरू माध्यक्मिक आश्रम शाळा, इस्लामपूर
या १३ मुलांना उल्लेखनीय चित्रकला प्रोत्साहन बक्षिस विभागून देण्यात येणार आहेत. चित्रकार अन्वर हुसेन यांनी उल्लेखनीय चित्र रेखाटणार्या मुलांचे अभिनंदन केले आहे.