इस्लामपूर येथील तालुका प्रमुख आणि शिवसैनिकाचा ना. शिंदेंकडून सन्मान

इस्लामपूर येथील सामान्य शिवसैनिकाचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईला बोलावून घेऊन सन्मान केला. आपण ज्या पक्ष संघटनेत काम करतो त्या पक्षप्रमुखांना भेटण्याची प्रत्येक पदाधिकाऱ्यांची मनोमन इच्छा असते. त्याच पध्दतीने सागर मलगुड हा एक सर्वसामान्य शिवसैनिक असून शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचा कार्यकर्ता आहे. आनंदराव पवार यांनी त्याला शिवसेना तालुकाप्रमुख पदाची जवाबदारी दिली. वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे भेट देतील का? अशी इच्छा सागर मलगुड यांनी आनंदराव पवार यांना बोलून दाखवली. त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रशासनाला याबाबत सांगितले.

३१ मार्चला जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांना फोन आला. तुमच्या तालुकाप्रमुखाला मुंबईला पाठवा. आपला साहेब भेटणार आहेत. असे असले वाढदिवस साजरा करणार का? असे प्रश्र मनात असताना मलगुड यांनी मुंबई गाठली. योगेश हुबाले प्रयोग गायकवाड, अनंत नाईक, सागर भोजुगडे, शुभम पाटील या कार्यकत्यांना सोबत घेऊन ठाणे येथे चैत्र नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी धाव घेतली. तिथे अँड. अशोक वैद्य यांनी सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तेच सर्वांना एकनाथ शिंदेसमोर घेऊन गेले.

शिवसेना वाळवा तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांचा १ एप्रिलचा वाढदिवस दीर्घकाळ स्मरणात राहील असाच झाला. सागर, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणत भला मोठा बुके दिला आणि वाढदिवस साजरा करत सुखद धक्का दिला. यावेळी नकळत डोळ्यात पाणी आल्याची भावना सागर मलगुंडे यांनी व्यक्त केली.