अक्षय कुमार, वीरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचा अवधी राहिला आहे. सत्ताधारी भाजपकडून उमेदवारांची निवड सुरू असून यंदाही भाजप बॉलिवूडकर आणि माजी क्रिकेटपटूंना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील  निवडणूक लढवू शकतो. अक्षय कुमार हा दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर, वीरेंद्र सेहवागदेखील निवडणूक लढवू शकतो.

लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत युती करण्यासोबतच आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्येही जागावाटप करण्यात आले आहे. यानंतर भाजपनेही दिल्लीतील जागांचा आढावा घेणे  सुरू केले आहे. काही जागांवर नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. खासदारांचा ट्रॅक रेकॉर्ड, एमसीडीमधील पराभव आणि इतर काही घटकांच्या आधारे भाजप यावेळी दिल्लीतील पाच किंवा सातही जागांवर नवीन चेहरे उभे करू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. यावेळी दोन जागांवर महिला उमेदवार देण्याची शक्यता आहे.