‘ॲनिमल’चे पोस्टर रिलीज, लिपलॉक करताना दिसले रश्मिका आणि रणबीर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून रश्मिका आणि रणबीर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. आता या चित्रपटातील पहिलं रोमँटिंक गाणं ११ ऑक्टोबर म्हणजे बुधवारी रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी नुकताच या गाण्याचे पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

‘ॲनिमल’ चित्रपटातले पहिलं गाणं ‘हुआ मैं’ हे ११ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सध्या निर्मात्यांनी गाण्याशीसंबंधित जास्त माहिती शेअर केलेली नाही. गाण्याच्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना रोमँटिंक अंदाजमध्ये दिसत आहेत. रणबीर आणि रश्मिका एकमेकांना किस करताना दिसत आहेत. प्रेक्षक आतापासूनच चित्रपटातील गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटतील पहिल्या गाण्याचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली आहे.

रश्मिका मंदानाने देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘हुआ मैं’ उद्या रिलीज होणार आहे. हे गाणे आग लावेल. प्रत्येक भाषेतील हे गाणे मला व्यक्तिशः खूप आवडले आहे.’ ‘ॲनिमल’ चित्रपटात रश्मिकाने गीतांजलीची भूमिका साकारली आहे.कताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.