2024 नंतर निवडणुकाच होणार नाहीत…..

देशात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी आघाडी इंडियादेखील वेगवेगळे दावे प्रतिदावे करत आहेत. भारतीय राजकारणाची नस ओळखलेला माणूस अशी ज्यांची ख्याती आहे ते प्रशांत किशोर याबाबत काय विचार करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर सध्या बिहारमध्ये पदयात्रा करत आहेत. जवळपास दीड वर्षांपासून त्यांच्या जनसुराज अभियानच्या माध्यमातून ते पदयात्रा करत आहेत. या पदयात्रेदरम्यान त्यांच्याशी चर्चा करत त्यांच्या प्रवास आणि भविष्यातील नियोजनाबद्दल चर्चा केली. तसंच आगामी निवडणूक आणि सत्ताधारी आणि विरोधकांची रणनिती याबाबतही जाणून देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना विरोधकांनी मैदानात उतरायला खूप उशीर केला आहे, असं मत त्यांनी मांडलं. तसंच 2024 च्या निवडणुकीनंतर सगळं काही संपणार या विचारावरही त्यांनी परखडपणे भूमिका मांडली.यावेळच्या निवडणुकीत त्यांच्या संघटनेची किंवा त्यांची काहीही भूमिका नसेल असं स्पष्ट करत त्यांनी त्यांच्या अभियानाबाबतही माहिती दिली. त्यांच्या मुलाखतीचा काही भाग याठिकाणी देत आहोत.