विश्वजित कदम यांची विधानसभेत मागणी….

सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. राज्यात सर्वाधिक कमी पाऊस झालेला हा जिल्हा आहे. जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज या दुष्काळी तालुक्यांमध्ये तर खूपच बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैशाळ, आरफळ या योजनांचे आवर्तनाचे नियोजन वेळेत व्हावे, पिण्यासाठी व शेतीसाठी वेळेत पाणी मिळावे, अशी मागणी माजी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी विधान सभागृहात केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.