हातकणंगले तालुकाध्यक्षपदी….

इचलकरंजी येथील अॅड. राहुल राजीव आवळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हातकणंगले तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

या वेळी युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र उभारण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी व्हावे, असे आवाहन पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

युवा वर्गाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे निवडीनंतर अॅड.आवळे यांनी सांगितले. या वेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार राजीव आवळे, कोल्हापूर शहराध्यक्ष आर. के. पवार, तालुकाध्यक्ष धनाजी करवते, मदन कारंडे, वैभव कुंभार, बाहुबली गाठ उपस्थित होते.