आटपाडी येथे महिलेने तब्बल अडीच लाख रुपये घरातून लांबवले. पैसे चोरल्याची कबुली दिली. परंतु पैसे देण्यास टोलवाटोलवी केली. त्यामुळे तिच्याविरुद्ध चोरीची फिर्याद नोंदवण्यात आली. दत्ता भगवान हाके ( वय ४५, करगणी, ता. आटपाडी) यांच्या राहत्या घरातून १७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास अडीच लाख रुपयांची रक्कम लांबवण्यात आली. हाके यांना मनीषा हिरामण वाघमारे (रा, मांडवा कोरडे, ता.अलिबाग, जि. रायगड) या महिलेचा संशय होता. या महिलेनेच रक्कम चोरली असावी असा संशय हाके यांना होता. हाके त्या दिवशी घराबाहेर गेले. तेव्हा मनीषा हिने त्यांच्या राहत्या घराची कडी काढून प्रवेश केला. कपाटावर ठेवलेली अडीच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन तिने पलायन केले. तिच्याशी हाके यांनी संपर्क साधला, तेव्हा मी पैसे नेल्याचे तिने सांगितले. आज आणून देतो, उद्या देतो असे सांगत तिने टोलवाटोलवी केली. पैसे दिले नाहीत. अखेर दत्ता हाके यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात मनिषा वाघमारे हिच्याविरोधात फिर्याद नोंदविली.
Related Posts
विवाहितेवर बलात्कार एकावर गुन्हा
अलीकडे गुन्हेगारी प्रकारात खूपच वाढ पहायला मिळत आहे. कधी खून, मारामारी तर कधी महिलांवर अत्याचार. अशीच एक घटना आटपाडी तालुक्यात…
आटपाडी मतदारसंघात राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या आमदारकीसाठी दैवी शक्तीचा प्रयोग! जोरदार चर्चा
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना आमदार करण्यासाठी आटपाडी तालुक्यातून जोरदार यंत्रणा गतिमान झाली असून राजेंद्र अण्णा आमदार व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी…
विधानसभा निवडणुकीसाठी आटपाडीच्या देशमुख वाड्यावर दुहीची बीजे! माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मनोदय
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात मातब्बर असलेल्या काही घराण्यात जुन्या वादाबरोबरच नव्या वादाने डोके वर काढले असून यातून आटपाडीच्या…