इचलकरंजीत बीएसएनएलचे भिडाचे पोल चोरीला, चौकशीचे आदेश….

इचलकरंजी शहरात सध्या चोरीच्या प्रमाणात वाढ होतानाचे चित्र दिसतच आहे. कधी मंदिरात तर कधी बंद घरे फोडली जात आहेत. सध्या इचलकरंजी शहरात चोरीचा असा एक प्रकार उघडकीस आलेला ज्यामुळे प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. इचलकरंजी शहरामधील बीएसएनएल ऑफिस मधील भिडाचे पोल हे कंत्राटी कर्मचारी विकत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांना माहिती मिळालेली होती. त्यांनी याची माहिती ज्यावेळेस बीएसएनएल ऑफिस तसेच पोलिसांना कळवली असता याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आलेले होते.सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी याची ऑनलाईन तक्रार केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे केली आहे. याची दखल घेत या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय बीएसएनएल कार्यालय यांनी दिलेले आहेत.

इचलकरंजी शहरांमध्ये खूप काही दशकांपासून बीएसएनएलची फोन, मोबाईल सर्व्हिस दिली जात आहे. सध्या फायबर युग आल्यामुळे बीएसएनएलचे भीडाचे पोल काढून ते बीएसएनएलच्या सरकारी जागेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. परंतु सध्या कंत्राटी अधिकारी हे भीडाचे पोल सध्या कंत्राटी कामगार आपल्या गाडीवरून घेऊन ते शहापूर येथील स्क्रॅब दुकानात विकत आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना तसेच पोलिसांना कळविलेली होती तरी सुद्धा याकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं केंद्रीय बीएसएनएल कार्यालय यांनी या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.