इचलकरंजीत ७ एप्रिलला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

यड्राव येथील शरद सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज आणि दक्षिण भारत जैन सभा कोल्हापूर विभागातर्फे जयसिंगपूर व इचलकरंजी येथे ६ व ७ एप्रिलला दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन परिसंवादाचे आयोजन केले आहे.प्रथमाचार्य परमपूज्य १०८ श्री शांतिसागरजी महाराज आचार्यत्व पदारोहण शताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

जयसिंगपूर येथे शनिवारी (ता. ६) सहकारमहर्षी शामराव पाटील (यड्रावकर) नाट्यगृहामध्ये दुपारी तीन वाजता ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर व उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके विद्यार्थी व पालकांशी संवाद साधणार आहेत.

इचलकरंजी येथे रविवारी (ता.७) यशोलक्ष्मी मंगल कार्यालय (कबनूर) येथे सकाळी ११ वाजता वेलणकर व जॉईंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, कोल्हापूर प्राजक्ता ठाकूर विद्यार्थी व पालकांशी संवाद साधणार आहेत.

संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील प्रमुख पाहुणे आहेत. शरद इन्स्टिट्यूट व दक्षिण भारत सभेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दहावी, बारावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी परिसंवादाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेमार्फत केले आहे..