आता सांगलीत धावणार इलेक्ट्रिक बसेस…

सांगली महापालिका प्रदूषित शहरांच्या यादीत आहे. त्यामुळे या योजनेतून शहरातील प्रदूषणालाही आळा बसेल.
महापालिका क्षेत्रात या वर्षअखेरीस इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत.
केंद्र सरकारच्या पीएम-ई बस योजनेत५० बसगाड्यांना तत्त्वतः मंजुरी मिळाली असून मिरजेत मध्यवर्ती स्थानकांत चार्जिंग स्टेशन असेल. या कामासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या वतीने त्यासाठीचा आराखडा अंतिम टप्प्यात असून लवकरच तो शासनाकडे पाठवला जाणार आहे.
गतवर्षी ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने देशभरातील १६९ शहरांसाठी खासगी-सार्वजनिक सहभागातून १० हजार ई -बसेस पुरवण्यात येतील, असे जाहीर केले होते. केंद्र सरकार ही वाहने महापालिकेला देईल. त्या चालवण्यासाठी प्रतिकिलोमीटर २४ व २२ रुपये अनुदान देणार आहे. या योजनेसाठी महापालिकेच्या स्तरावर परिवहन समिती नियंत्रण करेल. बस चालवण्यासाठी देखभालीसह ठेकेदाराची नियुक्ती केली जाईल. अनुदान व प्रवासी तिकीट उत्पन्नासह अन्य जाहिरातीस अन्य स्थानिक उत्पन्नातून ही बस चालवण्याची जबाबदारी महापालिकेची असेल