मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शुक्रवारी (ता. ८) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे इचलकरंजी रोडलगत कोरोची येथील माळावर आयोजन केले आहे.
कार्यक्रमासाठी सुमारे पन्नास हजार महिला उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने सुरक्षेसाठी वाहतूक मार्गात बदल केल्याची माहिती पोलिस प्रशासनाने पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.
वाहतूक मार्गातील बदल असे :
तारदाळ फाटा येथून येणारी वाहतूक बंद राहणार आहे. ती तारदाळ खोतवाडीमार्गे इचलकरंजीकडे मार्गस्थ केली आहे. हातकणंगले येथील इचलकरंजी फाटा येथून व हातकणंगले पोलिस ठाण्यासमोरून इचलकरंजीकडे जाणारी वाहतूक बंद असून ती अतिग्रे मार्गे, तिळवणी कोरोची मार्गावरील वाहतूक रुई फाटा मार्गे इचलकरंजीकडे मार्गस्थ केली आहे.
पंचगंगा कारखाना मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. ती शहापूर मार्गे, यड्राव फाटा मार्गे सोयीस्कर मार्गस्थ केली आहे. हातकणंगले येथील इचलकरंजी फाटा ते यड्राव फाटा हा परिसर सर्व वाहनांसाठी नो पार्किंग झोन केल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून दिली.
