इचलकरंजी शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे प्रमाणपत्र तातडीने मिळावे, अशी मागणी ताराराणी विद्यार्थी आघाडीने केली आहे.
शिष्टमंडळाने कोल्हापूर येथील समाजकल्याण विभागाचे उपायुक्त उमेश घुले यांना याबाबतचे निवेदन दिले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे, इचलकरंजी शहराध्यक्ष फहिम पाथरवट, तळंदगे शहराध्यक्ष तुषार बाणदार, भगवान लाखे, अमोल कांबळे, गायत्री कांबळे आदी उपस्थित होते.