तुम्ही चिकन खाता का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, नागपूर येथे बर्ड फ्लूचा उद्रेक झाला असून शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.राज्य सरकारच्या नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची लागण झाल्याने या कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे.राज्य सरकारच्या नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममधील काही कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांत शेकडोंच्या संख्येत कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने पशू संवर्धन विभाग सतर्क झाले. तसेच पशू संवर्धन विभागाने या संदर्भात तपासणीसाठी मृतक कोंबड्यांचे नमुने हे तपासणीसाठी पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. या प्रयोगशाळेतील अहवाल अखेर प्राप्त झाला असून या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला असल्याचं समोर आलं आहे.